Services de bibliothèque publique pour les Canadiens incapables de lire les imprimés
  • Astuces d'accessibilité pour appareils mobiles
    • Modifier le contraste
      • AJaune sur fond noir sélectionné
      • ANoir sur fond jaune sélectionné
      • ABlanc sur fond noir sélectionné
      • ANoir sur fond blanc sélectionné
      • AContraste par défaut sélectionné
    • Modifier la taille du texte
      • Taille du texte Petit sélectionné
      • Taille du texte Moyen sélectionné
      • Taille du texte Grand sélectionné
      • Taille du texte Maximum sélectionné
    • Modifier la police du texte
      • Arial sélectionné
      • Verdana sélectionné
      • Comic Sans MS sélectionné
    • Ajuster l'espacement entre les lignes de texte
      • Étroit sélectionné
      • Moyen sélectionné
      • Grand sélectionné
  • Abonnement
  • Se connecter
  • English
  • Accueil
  • Journaux
  • Magazines
  • Recommandations
  • Pour bibliothèques
  • Aide
  • Passer au contenu
      • Modifier le contraste
        • AJaune sur fond noir sélectionné
        • ANoir sur fond jaune sélectionné
        • ABlanc sur fond noir sélectionné
        • ANoir sur fond blanc sélectionné
        • AContraste par défaut sélectionné
      • Modifier la taille du texte
        • Taille du texte Petit sélectionné
        • Taille du texte Moyen sélectionné
        • Taille du texte Grand sélectionné
        • Taille du texte Maximum sélectionné
      • Modifier la police du texte
        • Arial sélectionné
        • Verdana sélectionné
        • Comic Sans MS sélectionné
      • Ajuster l'espacement entre les lignes de texte
        • Étroit sélectionné
        • Moyen sélectionné
        • Grand sélectionné
  • Astuces d'accessibilité
Services de bibliothèque publique pour les Canadiens incapables de lire les imprimés

Centre d'accès équitable aux bibliothèques
Services de bibliothèque publique pour les Canadiens incapables de lire les imprimés

  • Abonnement
  • Se connecter
  • English
  • Accueil
  • Journaux
  • Magazines
  • Recommandations
  • Pour bibliothèques
  • Aide
  • Recherche avancée
  • Explorer par catégorie
  • Conseils de recherche
Fil d'Ariane
  1. Accueil

Résultats de recherche de titre

Aller aux filtres

Articles 1 à 20 sur 2023

Shikshanshastra Class 12 - Maharashtra Board: शिक्षणशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

इयत्ता बारावी या शिक्षणशास्त्र विषयामध्ये शैक्षणिक तत्त्वज्ञान, शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक समाजशास्त्र, शैक्षणिक व्यवस्थापन, शैक्षणिक संशोधन अशा अनेक विषयांचा समावेश होतो.…

संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेण्यास शिक्षणशास्त्र विषयाची मदत होते. प्रस्तुत पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आता शिक्षणशास्त्र या विषयाशी अधिक प्रमाणात परिचय होणार आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून आणखी काही बाबींचे सखोल अध्ययन करावयास मिळेल. अध्ययन प्रक्रियेची मूलभूत संकल्पना आणि तिची वैशिष्ट्ये, उत्तम शैक्षणिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, अभ्यासक्रम विकसनाची तत्त्वे, मूल्यमापन पद्धतीची वैशिष्ट्ये, शैक्षणिक संशोधनाच्या विविध पद्धती आणि शिक्षणक्षेत्रात नव्याने प्रविष्ट झालेले नवप्रवाह हे सर्व जाणून घेणे शिक्षणशास्त्राचा विद्यार्थी म्हणून खूप उपयुक्त व महत्त्वाचे ठरणार आहे.

Gomant Bharati Pustak Tisare Tritiy Bhasha-Marathi class 10 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक तिसरे तृतीय भाषा-मराठी इयत्ता दहावी - गोवा बोर्ड

Par Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal. 2014

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे तयार करण्यात आलेले 'गोमंत भारती, पुस्तक तिसरे' हे पाठ्यपुस्तक इयत्ता दहावीच्या तृतीय भाषा…

मराठी या विषयासाठी आहे. मंडळाने संमत केलेल्या मराठीच्या अभ्यासक्रमानुसार या पाठ्यपुस्तक मालेचे आयोजन केलेले असून तिच्यातील पहिली दोन पुस्तके पूर्वीच प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना अनुसरूनच प्रस्तुत पाठ्यपुस्तकातील वेच्यांची निवड केली आहे, व भाषाभ्यास दिला आहे. पाठपरिचयं, लेखकपरिचय, शब्दार्थ, टीपा इ. गोष्टीही पूर्वीच्या पद्धतीने दिल्या आहेत. संपादकीय धोरणातील या सुसूत्रतेमुळे या विषयाच्या अभ्यासामागील उद्दिष्टे सुलभतेने सफल होतील, असा विश्वास वाटतो. भाषेचा अभ्यास, साहित्याची गोडी व मानवी मूल्यांचे आकलन हीच ती उद्दिष्टं होत. प्रस्तुत पाठ्यपुस्तकातील गद्य - लेखन मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र शासन व शैक्षणिक संस्था यांनी पुरस्कृत केलेल्या शुद्धलेखनविषयक नियमांना अनुसरून केले आहे.

Sanrakshanshastra Class 12 - Maharashtra Board: संरक्षणशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2020

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

इयत्ता बारावीचे संरक्षणशास्त्र हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये भारताच्या संदर्भातील राष्ट्रीय सुरक्षेच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार आहोत. पहिल्या प्रकरणात भारताच्या…

लष्करी, राजकीय आणि राजनयिक, आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आणि अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा या विविध पैलूंना समजावून घेण्यासाठीचा आराखडा दिलेला आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये भारताच्या अंतर्गत सुरक्षेला असलेल्या समस्यांसंबंधी जगातील विविध भूभाग व देश यांच्याशी भारताचे असलेले संबंध यांचा परामर्श घेतला आहे. शेवटच्या प्रकरणात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेजारील देशांशी झालेल्या विविध युध्दांची माहिती दिलेली आहे.

Sahakar class 11 - Maharashtra Board: सहकार इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

सहकार इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री.…

विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. आपल्या सभोवताली सजीव सृष्टीमध्ये सहकार दिसून येतो. उच्च माध्यमिक स्तरावर ‘सहकार' या विषयाची निवड कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी प्रथमत: करतात. सहकार ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन यासाठीचे अध्ययन करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या सर्व बाबींचा योग्य आणि सुसंबंध पद्धतीने या पुस्तकात समावेश केलेला आहे. अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना सहकाराचा इतिहास, सहकारी संस्थेची स्थापना, विविध व्यवसाय संघटना, सहकाराची तत्त्वे, सहकारी संस्थांचे महत्त्वाचे प्रकार इ. बाबत ज्ञान मिळवून त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करता यावा, यासाठी 'सहकार' विषयाच्या पाठ्यपुस्तकाची रचना सहज व सोप्या भाषेत करण्यात आली आहे.

Vanijya Sanghatan Va Vyavasthapan Class 12 - Maharashtra Board: वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे पुस्तक व्यवसाय संघटनेविषयी अत्यावश्यक असणाऱ्या ‘व्यवस्थापनाची तत्त्वे' आणि 'व्यवस्थापनाची कार्ये' याविषयी ज्ञान प्राप्त करून देते.…

व्यवस्थापनाविषयी अध्ययन केल्यानंतर 'उद्योजकतेचा विकास' या घटकामध्ये उद्योजक व उद्योजकापुढील भविष्यातील संधी याविषयी ज्ञान मिळवतील. विविध व्यवसाय संघटनांना व्यवसाय सेवांचे महत्त्व 'व्यावसायिक सेवा' या पाठामार्फत दिले गेले आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये चित्रे, आकृत्या, कृती यांचा समावेश संकल्पना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी करण्यात आला आहे. सरावासाठी स्वाध्याय व उत्तर-सूचीचा समावेशदेखील केला आहे. सुस्पष्ट असलेले आणि बुद्धीला चालना देणारे ‘अधिक माहितीसाठी' याचा नव्याने समावेश केला गेला आहे. या पुस्तकाची रचना अशा प्रकारे केली आहे, की त्यातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ होईल व शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही या पुस्तकाचा आनंद घेऊ शकतील.

Sathottari Marathi Kavita SYBA Third Semester - RTMNU

Par Abc. 2021

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

'साठोत्तरी मराठी कविता' हे १९६० नंतरच्या मराठी काव्याचे प्रातिनिधिक संपादन मराठी अभ्यासकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि रसिक वाचकांच्या भावराज्यात प्रस्तुत केलेले आहे.…

काव्याची निर्मिती आणि काव्याची समीक्षा ह्यांचा प्रवास, कालखंडाचा विचार करता कधीही समांतरपणे घडून येत नाही. काव्यनिर्मिती स्थिरस्थावर झाल्यावर, काहीएक मान्यता प्राप्त झाल्यावर, तिला काव्यसंग्रहांचे रूप प्राप्त झाल्यावर; त्यानंतर मग समावेशक अशा समीक्षा-विश्लेषणाला सुरुवात होत असते. ६० नंतरच्या बहुआयामी मराठी काव्यप्रवाहाची समीक्षा साधारणपणे १९९० नंतर आकाराला आलेली दिसते. त्यानंतरच्या गत तीन दशकांत त्याविषयीचे निश्चित असे मूल्यात्मक निष्कर्षही प्रतिपादित केले गेले. प्रस्तुत संग्रहास जोडलेल्या काव्यसमीक्षाग्रंथाच्या सूचीवरूनही ह्या विशिष्ट वाङ्मयव्यवहाराची कल्पना येऊ शकते. आधुनिक मराठी काव्यपरंपरेला खऱ्या अर्थाने 'नवी' वळणे आणि नवे' प्रवाह साठोत्तर काळातच मिळालेले दिसतात. आठशे वर्षांच्या समृद्ध मराठी काव्यपरंपरेला ह्याच काळात नवनवे वैशिष्ट्यपूर्ण धुमारेही फुटलेले दिसतात. प्रस्तुत संपादनात मराठी काव्यधारेची हीच विविधता आणि समृद्धता संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे.

Maharashtracha Bhugol 2 SYBA Fourth Semester - SPPU

Par Abc. 2021

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) SYBA Geography (S1) Semester - IV साठी महाविद्यालयीन 'महाराष्ट्राचा भूगोल 2' हे पाठ्यपुस्तक प्रकाशित कलेले…

आहे. या नवीन अभ्यासक्रमात एकूण चार प्रकरणे आहेत: १. कृषी, २. लोकसंख्या आणि वसाहत, ३. ग्रामीण विकास आणि ४. पर्यटन. 'महाराष्ट्राचा भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल यात शंका नाही. ज्या राज्यात आपण राहतो त्याची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश हा विषय सुरू करण्याचा आहे.

Grahvyavasthapan class 11 - Maharashtra Board: गृहव्यवस्थापन इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

गृहव्यवस्थापन इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री.…

विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. गृहव्यवस्थापन या विषयाचे पाठ्यपुस्तक व्यवस्थापनाची तत्त्वे आणि प्रक्रिया व त्याचे घराकरिता उपयोजन यांच्याशी संबंधित आहे. सदर पाठ्यपुस्तक गृहव्यवस्थापनाचा अर्थ व महत्त्व, व्यवस्थापनाचे प्रेरक घटक, व्यवस्थापन प्रक्रिया, निर्णय घेणे, कौटुंबिक संसाधने, गृह स्वच्छता या गोष्टींचे मूलभूत ज्ञान प्रदान करते. या पाठ्यपुस्तकात कुटुंबाचे निवासस्थान आणि घरातील फर्निचर अशा नवीन जिज्ञासा निर्माण करणाऱ्या प्रकरणांची माहिती देते. तसेच पुष्परचना, लँडस्केपिंग यासारख्या प्रकरणांमधून कौशल्य विकासावर भर देता येईल. यामुळे विद्यार्थी अनुभव संपन्न होतात. त्यांच्यात ‘शिका आणि कमवा' ही भावना विकसित होण्यास मदत होते. या पुस्तकातील घटकांमुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात आदान प्रदान वाढून त्यांच्यात सहसंबंध निर्माण होतात.

Granthalay Ani Mahitishastra Class 12 - Maharashtra Board: ग्रंथालय आणि माहितीशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

ग्रंथालय आणि माहितीशास्त्र इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे…

तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. 'ग्रंथालय आणि माहितीशास्त्र' या विषयाच्या अभ्यासक्रमात नवीन संकल्पनांचा समावेश करणे अथवा त्याचे प्रतिबिंब असणे निश्चितच गरजेचे झाले आहे. या दृष्टिकोनातून सामाजिक हित जोपासणारी सार्वजनिक ग्रंथालय निर्मिती चळवळीची गरज येथपासून ग्रंथालय व्यवस्थापनशास्त्र, माहितीसेवा, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी विविध घटक पाच प्रकरणातून विद्यार्थ्यांना स्पष्ट केले आहेत. वाचकांना हवी असलेली माहितीसाधने व ‘माहिती' घटक कसे पोहचवता येतात हे विविध प्रकरणांद्वारे स्पष्ट केले आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाद्वारे ग्रंथालयातील विविध कार्ये कशी पार पाडता येतील व वाचकांना कार्यक्षमपणे ‘माहितीसेवा' कशा देता येतील, यांसंदर्भातील अभ्यास या पाठ्यपुस्तकात वर्णन केलेला आहे.

Grahvyavasthapan class 12 - Maharashtra Board: गृहव्यवस्थापन इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

गृहव्यवस्थापन इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री.…

विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. औद्योगिकीकरण, जागतिकीकरण आणि डिजिटायझेशनच्या काळात सहज, स्वास्थ्यपूर्ण आणि दर्जेदार जीवन जगण्यासाठी संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हे पाठ्यपुस्तक गृहव्यवस्थापनाच्या क्षेत्रामधील मूलभूत संज्ञा तसेच आधुनिक बाबी देखील समाविष्ट करते. कौशल्य विकसन, पर्यावरण रक्षण आणि ग्राहकता यांवर देखील पाठ्यपुस्तक केंद्रित आहे. काही घटक उद्योजकता विकासासाठी लाभदायक ठरतील आणि 'कमवा आणि शिका' यासाठी संधी उपलब्ध करून देतील.

Sanrakshanshastra class 11 - Maharashtra Board: संरक्षणशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

इयत्ता अकरावीचे पुस्तक हे राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेला केंद्रभूत मानून तयार केले गेले आहे. संरक्षणशास्त्र या विषयाच्या वेगवेगळ्या घटकांचा परिचय…

यात दिला आहे. यामध्ये राष्ट्रहित आणि राष्ट्रीय सुरक्षा; भूराजनीती; संरक्षण अर्थशास्त्र; लष्करी इतिहास; विज्ञान आणि तंत्रज्ञानांचे कार्य यांचा समावेश केला गेला आहे. या सर्व संकल्पना भारताच्या संदर्भात चर्चिल्या गेले आहेत. संरक्षणक्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबी या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्याचा तुम्हांला निश्चितच उपयोग होईल. पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करताना सुचवलेले उपक्रम शिक्षक आणि पालकांच्या मदतीने पूर्ण करा. याच बरोबर क्यू. आर. कोडचाही वापर करावा.

Vastrashastra Class 12 - Maharashtra Board: वस्त्रशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

वस्त्रशास्त्र इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री.…

विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ह्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम सुधारित असून त्यात वैशिष्टयपूर्ण अशा मानवनिर्मित तंतू आणि त्याचे आपल्या दैनंदिन जीवनात सतत वाढत जाणारे उपयोग, रंगाई, छपाई व फॅशन डिझायनिंग यांच्याशी संबंधित प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. हे पाठ्यपुस्तक अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांना वस्त्रशास्त्राचे विविध पैलू, त्याचा वैभवशाली प्राचीन इतिहास आणि हल्ली प्रचलित असलेला कल याचे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे. तुम्हांला वस्त्रशास्त्राची निगडीत विविध क्षेत्रांची रूपरेषा दाखविल्यावर भर देण्यात आला आहे.

Aadhunik Rajkiya Vishleshan Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU

Par Abc. 2021

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

शैक्षणिक वर्ष 2020-2021 च्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तृतीय वर्ष कला शाखेसाठी राज्यशास्त्र सामान्य स्तर पेपर-3 (G-3) CC-1E (3) साठी 'आधुनिक राजकीय…

विश्लेषण' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'आधुनिक राजकीय विश्लेषण' या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश आधुनिक राजकीय विश्लेषण ही एक अध्ययन शाखा म्हणून विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, आधुनिक राजकीय विश्लेषणातील विविध विश्लेषणात्मक सिद्धान्तांचा आणि दृष्टिकोनांचा परिचय होणे आणि आधुनिक राजकीय विश्लेषणाचे दृष्टिकोन अभ्यासणे हे आहे. 'आधुनिक राजकीय विश्लेषण' या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी या अभ्यासक्रमाचा निश्चितच उपयोग होईल या उदात्त हेतूने 'राज्यशास्त्र अभ्यास मंडळ' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी या अभ्यासक्रमाची रचना केली आहे.

Kalecha Itihas Va Rasgrahan class 12 - Maharashtra Board: कलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

कलेचा इतिहास व रसग्रहण इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले…

आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. दैनंदिन जीवनात कला या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलेची विविध अंगे आत्मसात करता करताच कलेच्या इतिहासाचाही परिचय व्हावा, हा या पाठ्यपुस्तक निर्मितीमागील हेतू आहे. या पुस्तिकेत मूलभूत अभ्यासक्रमाच्या रूपरेषेनुसार भारतीय व पाश्चात्य कलेच्या इतिहासाची ओळख व्हावी आणि कला इतिहासाच्या अभ्यासाचे क्षेत्रही स्पष्ट व्हावे, ह्या दृष्टीने सैद्धांतिक व प्रात्यक्षिक अशा दोन विभागांत अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आलेली आहे.

Sanshodhan Paddhati Ani Manasashastriya Mapan TYBA Fifth Semester - SPPU

Par Abc. 2019

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

संशोधन पद्धती आणि मानसशास्त्रीय मापन मानसशास्त्र हा विषय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पातळीवर मराठी माध्यमातून शिकणारा विद्यार्थीवर्ग बराच मोठा आहे. मात्र…

इंग्रजी भाषेची अडचण असल्यामुळे उत्तम बौद्धिक कुवत असूनही या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला मर्यादा पडतात. हा विद्यार्थीवर्ग डोळ्यांसमोर ठेवून आम्ही २००१ मध्ये ' प्रायोगिक मानसशास्त्र आणि संशोधन पद्धती' हे पहिले तांत्रिक विषयावरचे मराठीतून पुस्तक लिहिले. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अशा दोन्ही पातळीवर विद्यार्थ्यांकडून या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला. दोन पुस्तकांमध्ये संशोधनसंबंधीची विखुरलेली माहिती सलगपणे एका पुस्तकातून देण्याच्या प्रामाणिक हेतूने आम्ही सादर करीत आहोत.

Antararashtriya Arthashastra 1 TYBA Fifth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र 1 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे

Par Dr D. G. Ushir, Prof. G.J. Lomte, Prof. S.A. Gaikwad, Dr S. G. Sawant. 2021

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून कला व वाणिज्य विद्या शाखांसाठी CBCS पद्धती लागू केली आहे. त्यानुसार पदवी व…

पदव्युत्तर वर्गाचे अभ्यासक्रम बदलण्यात आले. तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र: Special - III अंतर्गत 'आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र' हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. 'आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र १' हा विषय या पूर्वीच्या अभ्यासक्रमात होताच; परंतु नवीन अभ्यासक्रमामध्ये काही जास्तीचे घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या पुस्तकात सर्व नवीन सिद्धान्त आणि घटकांचे विश्लेषण सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी पडेल.

Sukshma Arthashastra 2 Paper 1 SYBA Fourth Semester - SPPU

Par Abc. 2021

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

द्वितीय वर्ष कला शाखेसाठीच्या सूक्ष्म अर्थशास्त्र (एस-1) भाग II साठी हे पुस्तक पूर्णपणे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने…

काही जास्तीचे मुद्देदेखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परिभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील कटाक्षाने विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.

Sahakar Class 12 - Maharashtra Board: सहकार इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Audio avec voix de synthèse

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता १२ वी कला व वाणिज्य शाखेसाठी ‘सहकार’ या विषयाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तक आहे. सहकाराचे…

मानवी समाजजीवनातील महत्त्व लक्षात घेऊन इयत्ता ११ वी मध्ये सहकाराचे प्राथमिक स्वरूपातील ज्ञान अभ्यासले आहे. त्यावरच आधारित इयत्ता १२ वीच्या अभ्यासक्रमात सहकारी संस्थांचे संघटन, सचिवाचा पत्रव्यवहार, सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६०, सहकारी बँकांचा अभ्यास, सहकार शिक्षण व प्रशिक्षण आणि सहकार क्षेत्रापुढील आव्हाने हे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. या विषयाच्या घटकांची मांडणी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० व नियम १९६१ च्या अनुषंगाने करण्यात आली आहे. या कायद्यात वेळोवेळी दुरूस्त्या झाल्या असून ९७ वी सुधारणा व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम २०१३ अन्वये अनेक दुरूस्त्या करण्यात आल्या आहेत. या सुधारणांचा व दुरूस्त्यांचा विचार अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

Nijdosh Darshanane... Nirdosh: निजदोष दर्शनाने... निर्दोष

Par Dada Bhagwan. 2016

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Spiritualité
Audio avec voix de synthèse

परम पूज्य दादाश्रींचे ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आतील सर्व क्रियांना पाहू शकाल आणि विश्लेषणही करु शकाल. ही समज, पूर्ण ज्ञान…

अवस्थेपर्यंत पोहचण्यासाठीची सुरुवात आहे. ज्ञानाच्याप्रकाशात तुम्ही विना राग-द्वेष, स्वत:च्या चांगल्या तसेच वाईट विचारांच्या प्रवाहाला पाहू शकाल. तुम्हाला चांगले किंवा वाईट पाहण्याची गरज नाही, कारण विचार परसत्ता आहे. तर मग प्रश्न हा आहे की ज्ञानी या जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतात? तर ज्ञानी जगाला निर्दोष पाहतात. ज्ञानी हे जाणतात की जगातील सर्व क्रिया पूर्वी चार्ज केलेल्याचे डिस्चार्ज आहे. ते हे जाणतात की जग निर्दोष आहे. नोकरीत साहेबांसोबत झालेले भांडण किंवा अपमान, हे केवळ तुमच्या पूर्वी चार्ज केलेल्याचे डिस्चार्ज आहे. साहेब तर फक्त निमित्त आहेत. संपूर्ण जग निर्दोष आहे. ज्या पण काही अडचणी आपल्यावर येतात त्या तर मूळत: आपल्याच चुकांच्या परिणाम स्वरुपात आहेत. त्या सर्व आपल्याच ब्लंडर्स व मिस्टेक्स आहेत. ज्ञानींच्या कृपेने सर्व चुका मिटून जातात. आत्मज्ञान नसलेल्या माणसाला स्वत:च्या चुका न दिसता फक्त दुसऱ्यांच्याच चुका दिसतात. निजदोष दर्शनावर परम पूज्य दादाश्रींची समज, उपाय आणि त्यास जीवनात उतरवण्यासाठीच्या चाव्या या पुस्तकात संकलित केलेल्या आहेत. ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या मन, वचन, कायेचा पक्ष घेणे बंद करता आणि निष्पक्षपणे स्वत:च्या चुका स्वत:ला दिसू लागतात, तसेच अंतरशांती लाभण्याची सुरुवात होते.

Daan: दान

Par Dada Bhagwan. 2016

DAISY texte (Téléchargement direct), DAISY texte (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Spiritualité, Épanouissement personnel
Audio avec voix de synthèse

दान का अर्थ होता है किसीको कुछ देना| यह दान पैसों के रूप में हो सकता है, खाने के रूप…

में या सिर्फ किसी को खुश करने हेतु हो सकता है| दान देने से हमें खुशी मिलती है क्योंकि हमें लगता है कि हमने कुछ अच्छा काम किया है| दान करने से बहुत सारे फायदे होते है| जिसका विस्तारित वर्णन दादाश्री ने अपनी किताब ‘दान’ में किया है|इस किताब में दादाजी हमें यह भी बताते है कि किसे दान दे,क्या दान करना चाहिए, दान कितने प्रकार के होते है,दान करने के क्या फायदे है इत्यादि| दान करने से हम सिर्फ सामने वाले की मदद नहीं कर रहे पर खुद भी बहुत सारी खुशियाँ पाते है|दान का महत्व हमारे जीवन में क्या है, यह अधिक जानने के लिए, यह किताब ज़रूर पढ़े|

Pagination

  • Page courante 1
  • Page 2
  • Page 3
  • Page 4
  • Page 5
  • Page 6
  • Page 7
  • Page 8
  • Page 9
  • …
  • Page suivante
  • Dernière page

Limiter les résultats de recherche

Limiter les résultats de recherche

Préciser par date

Pour supprimer ces filtres, sélectionnez Tout le contenu.

Date d'acquisition

Date de publication

Foire aux questions

Quels appareils puis-je utiliser pour lire les livres et magazines du CAÉB

Réponse : Nos livres et magazines sont compatibles avec plusieurs appareils et applications de lecture accessibles. Consultez notre page Appareils et formats compatibles pour en savoir plus.

Foire aux questions

À propos

Le Centre d'accès équitable aux bibliothèques (CAÉB) offre le service de lecture accessible, mettant à la disposition des Canadiens incapables de lire les imprimés des livres et d'autres documents sur le support de leur choix.

  • En savoir plus sur le CAÉB
  • Confidentialité
  • Modalités sur l’utilisation acceptable
  • Bibliothèques membres

Suivez-nous

Tenez-vous au courant de toutes les actualités du CAEB.

  • Inscrivez-vous à nos bulletins
  • Blogue
  • Facebook
  • Bluesky
  • Twitter
  • Youtube

Boîte de suggestions

  • Suggérer un titre
  • Rapporter un livre endommagé
  • Adhésion au Groupe consultatif des utilisateurs
  • Adhésion au Groupe consultatif des enseignants

Nous joindre

Besoin d'aide? aide@bibliocaeb.ca ou 1-855-655-2273.

Visitez la pageNous joindrepour plus de détails.

Copyright 2025 CAÉB. Tous droits réservés.