Sathottari Marathi Kavita SYBA Third Semester - RTMNU
Audio avec voix de synthèse
Résumé
'साठोत्तरी मराठी कविता' हे १९६० नंतरच्या मराठी काव्याचे प्रातिनिधिक संपादन मराठी अभ्यासकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि रसिक वाचकांच्या भावराज्यात प्रस्तुत केलेले आहे. काव्याची निर्मिती आणि काव्याची समीक्षा ह्यांचा प्रवास, कालखंडाचा विचार करता कधीही समांतरपणे घडून येत नाही. काव्यनिर्मिती स्थिरस्थावर झाल्यावर, काहीएक मान्यता… प्राप्त झाल्यावर, तिला काव्यसंग्रहांचे रूप प्राप्त झाल्यावर; त्यानंतर मग समावेशक अशा समीक्षा-विश्लेषणाला सुरुवात होत असते. ६० नंतरच्या बहुआयामी मराठी काव्यप्रवाहाची समीक्षा साधारणपणे १९९० नंतर आकाराला आलेली दिसते. त्यानंतरच्या गत तीन दशकांत त्याविषयीचे निश्चित असे मूल्यात्मक निष्कर्षही प्रतिपादित केले गेले. प्रस्तुत संग्रहास जोडलेल्या काव्यसमीक्षाग्रंथाच्या सूचीवरूनही ह्या विशिष्ट वाङ्मयव्यवहाराची कल्पना येऊ शकते. आधुनिक मराठी काव्यपरंपरेला खऱ्या अर्थाने 'नवी' वळणे आणि नवे' प्रवाह साठोत्तर काळातच मिळालेले दिसतात. आठशे वर्षांच्या समृद्ध मराठी काव्यपरंपरेला ह्याच काळात नवनवे वैशिष्ट्यपूर्ण धुमारेही फुटलेले दिसतात. प्रस्तुत संपादनात मराठी काव्यधारेची हीच विविधता आणि समृद्धता संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे.