Sahakar Class 12 - Maharashtra Board: सहकार इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
Audio avec voix de synthèse
Résumé
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता १२ वी कला व वाणिज्य शाखेसाठी ‘सहकार’ या विषयाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तक आहे. सहकाराचे मानवी समाजजीवनातील महत्त्व लक्षात घेऊन इयत्ता ११ वी मध्ये सहकाराचे प्राथमिक स्वरूपातील ज्ञान अभ्यासले आहे. त्यावरच आधारित इयत्ता १२ वीच्या… अभ्यासक्रमात सहकारी संस्थांचे संघटन, सचिवाचा पत्रव्यवहार, सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६०, सहकारी बँकांचा अभ्यास, सहकार शिक्षण व प्रशिक्षण आणि सहकार क्षेत्रापुढील आव्हाने हे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. या विषयाच्या घटकांची मांडणी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० व नियम १९६१ च्या अनुषंगाने करण्यात आली आहे. या कायद्यात वेळोवेळी दुरूस्त्या झाल्या असून ९७ वी सुधारणा व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम २०१३ अन्वये अनेक दुरूस्त्या करण्यात आल्या आहेत. या सुधारणांचा व दुरूस्त्यांचा विचार अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.