Vanijya Sanghatan Va Vyavasthapan Class 12 - Maharashtra Board: वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
Audio avec voix de synthèse
Résumé
वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे पुस्तक व्यवसाय संघटनेविषयी अत्यावश्यक असणाऱ्या ‘व्यवस्थापनाची तत्त्वे' आणि 'व्यवस्थापनाची कार्ये' याविषयी ज्ञान प्राप्त करून देते. व्यवस्थापनाविषयी अध्ययन केल्यानंतर 'उद्योजकतेचा विकास' या घटकामध्ये उद्योजक व उद्योजकापुढील भविष्यातील संधी याविषयी ज्ञान मिळवतील. विविध व्यवसाय संघटनांना व्यवसाय सेवांचे… महत्त्व 'व्यावसायिक सेवा' या पाठामार्फत दिले गेले आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये चित्रे, आकृत्या, कृती यांचा समावेश संकल्पना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी करण्यात आला आहे. सरावासाठी स्वाध्याय व उत्तर-सूचीचा समावेशदेखील केला आहे. सुस्पष्ट असलेले आणि बुद्धीला चालना देणारे ‘अधिक माहितीसाठी' याचा नव्याने समावेश केला गेला आहे. या पुस्तकाची रचना अशा प्रकारे केली आहे, की त्यातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ होईल व शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही या पुस्तकाचा आनंद घेऊ शकतील.