Sahakar class 11 - Maharashtra Board: सहकार इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
Audio avec voix de synthèse
Résumé
सहकार इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. आपल्या सभोवताली सजीव सृष्टीमध्ये सहकार दिसून येतो. उच्च माध्यमिक… स्तरावर ‘सहकार' या विषयाची निवड कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी प्रथमत: करतात. सहकार ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन यासाठीचे अध्ययन करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या सर्व बाबींचा योग्य आणि सुसंबंध पद्धतीने या पुस्तकात समावेश केलेला आहे. अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना सहकाराचा इतिहास, सहकारी संस्थेची स्थापना, विविध व्यवसाय संघटना, सहकाराची तत्त्वे, सहकारी संस्थांचे महत्त्वाचे प्रकार इ. बाबत ज्ञान मिळवून त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करता यावा, यासाठी 'सहकार' विषयाच्या पाठ्यपुस्तकाची रचना सहज व सोप्या भाषेत करण्यात आली आहे.