Résultats de recherche de titre
Articles 1 à 20 sur 1473
Čujte Srbi! Čuvaj te se sebe
Par Arčibald Rajs-Rudolf. 2011
Blago cara Radovana
Par Jovan Dučić. 2011
Izabrani tekstovi
Par Ivo Andriċ. 2010
Moje uspomene
Par Živojin Mišić. 2010
Antologija epske narodne poezije
Par Various. 2011
Malo jedro
Par Jovan Jovanović-Zmaj. 2011
Antologija lirske poezije
Par Službeni Glasnik. 2011
Shikshanshastra Class 12 - Maharashtra Board: शिक्षणशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021
इयत्ता बारावी या शिक्षणशास्त्र विषयामध्ये शैक्षणिक तत्त्वज्ञान, शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक समाजशास्त्र, शैक्षणिक व्यवस्थापन, शैक्षणिक संशोधन अशा अनेक विषयांचा समावेश होतो.…
संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेण्यास शिक्षणशास्त्र विषयाची मदत होते. प्रस्तुत पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आता शिक्षणशास्त्र या विषयाशी अधिक प्रमाणात परिचय होणार आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून आणखी काही बाबींचे सखोल अध्ययन करावयास मिळेल. अध्ययन प्रक्रियेची मूलभूत संकल्पना आणि तिची वैशिष्ट्ये, उत्तम शैक्षणिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, अभ्यासक्रम विकसनाची तत्त्वे, मूल्यमापन पद्धतीची वैशिष्ट्ये, शैक्षणिक संशोधनाच्या विविध पद्धती आणि शिक्षणक्षेत्रात नव्याने प्रविष्ट झालेले नवप्रवाह हे सर्व जाणून घेणे शिक्षणशास्त्राचा विद्यार्थी म्हणून खूप उपयुक्त व महत्त्वाचे ठरणार आहे.
Gomant Bharati Pustak Tisare Tritiy Bhasha-Marathi class 10 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक तिसरे तृतीय भाषा-मराठी इयत्ता दहावी - गोवा बोर्ड
Par Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal. 2014
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे तयार करण्यात आलेले 'गोमंत भारती, पुस्तक तिसरे' हे पाठ्यपुस्तक इयत्ता दहावीच्या तृतीय भाषा…
मराठी या विषयासाठी आहे. मंडळाने संमत केलेल्या मराठीच्या अभ्यासक्रमानुसार या पाठ्यपुस्तक मालेचे आयोजन केलेले असून तिच्यातील पहिली दोन पुस्तके पूर्वीच प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना अनुसरूनच प्रस्तुत पाठ्यपुस्तकातील वेच्यांची निवड केली आहे, व भाषाभ्यास दिला आहे. पाठपरिचयं, लेखकपरिचय, शब्दार्थ, टीपा इ. गोष्टीही पूर्वीच्या पद्धतीने दिल्या आहेत. संपादकीय धोरणातील या सुसूत्रतेमुळे या विषयाच्या अभ्यासामागील उद्दिष्टे सुलभतेने सफल होतील, असा विश्वास वाटतो. भाषेचा अभ्यास, साहित्याची गोडी व मानवी मूल्यांचे आकलन हीच ती उद्दिष्टं होत. प्रस्तुत पाठ्यपुस्तकातील गद्य - लेखन मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र शासन व शैक्षणिक संस्था यांनी पुरस्कृत केलेल्या शुद्धलेखनविषयक नियमांना अनुसरून केले आहे.
Sanrakshanshastra Class 12 - Maharashtra Board: संरक्षणशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2020
इयत्ता बारावीचे संरक्षणशास्त्र हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये भारताच्या संदर्भातील राष्ट्रीय सुरक्षेच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार आहोत. पहिल्या प्रकरणात भारताच्या…
लष्करी, राजकीय आणि राजनयिक, आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आणि अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा या विविध पैलूंना समजावून घेण्यासाठीचा आराखडा दिलेला आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये भारताच्या अंतर्गत सुरक्षेला असलेल्या समस्यांसंबंधी जगातील विविध भूभाग व देश यांच्याशी भारताचे असलेले संबंध यांचा परामर्श घेतला आहे. शेवटच्या प्रकरणात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेजारील देशांशी झालेल्या विविध युध्दांची माहिती दिलेली आहे.
Sahakar class 11 - Maharashtra Board: सहकार इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021
सहकार इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री.…
विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. आपल्या सभोवताली सजीव सृष्टीमध्ये सहकार दिसून येतो. उच्च माध्यमिक स्तरावर ‘सहकार' या विषयाची निवड कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी प्रथमत: करतात. सहकार ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन यासाठीचे अध्ययन करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या सर्व बाबींचा योग्य आणि सुसंबंध पद्धतीने या पुस्तकात समावेश केलेला आहे. अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना सहकाराचा इतिहास, सहकारी संस्थेची स्थापना, विविध व्यवसाय संघटना, सहकाराची तत्त्वे, सहकारी संस्थांचे महत्त्वाचे प्रकार इ. बाबत ज्ञान मिळवून त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करता यावा, यासाठी 'सहकार' विषयाच्या पाठ्यपुस्तकाची रचना सहज व सोप्या भाषेत करण्यात आली आहे.
Vanijya Sanghatan Va Vyavasthapan Class 12 - Maharashtra Board: वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021
वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे पुस्तक व्यवसाय संघटनेविषयी अत्यावश्यक असणाऱ्या ‘व्यवस्थापनाची तत्त्वे' आणि 'व्यवस्थापनाची कार्ये' याविषयी ज्ञान प्राप्त करून देते.…
व्यवस्थापनाविषयी अध्ययन केल्यानंतर 'उद्योजकतेचा विकास' या घटकामध्ये उद्योजक व उद्योजकापुढील भविष्यातील संधी याविषयी ज्ञान मिळवतील. विविध व्यवसाय संघटनांना व्यवसाय सेवांचे महत्त्व 'व्यावसायिक सेवा' या पाठामार्फत दिले गेले आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये चित्रे, आकृत्या, कृती यांचा समावेश संकल्पना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी करण्यात आला आहे. सरावासाठी स्वाध्याय व उत्तर-सूचीचा समावेशदेखील केला आहे. सुस्पष्ट असलेले आणि बुद्धीला चालना देणारे ‘अधिक माहितीसाठी' याचा नव्याने समावेश केला गेला आहे. या पुस्तकाची रचना अशा प्रकारे केली आहे, की त्यातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ होईल व शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही या पुस्तकाचा आनंद घेऊ शकतील.
Sathottari Marathi Kavita SYBA Third Semester - RTMNU
Par Abc. 2021
'साठोत्तरी मराठी कविता' हे १९६० नंतरच्या मराठी काव्याचे प्रातिनिधिक संपादन मराठी अभ्यासकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि रसिक वाचकांच्या भावराज्यात प्रस्तुत केलेले आहे.…
काव्याची निर्मिती आणि काव्याची समीक्षा ह्यांचा प्रवास, कालखंडाचा विचार करता कधीही समांतरपणे घडून येत नाही. काव्यनिर्मिती स्थिरस्थावर झाल्यावर, काहीएक मान्यता प्राप्त झाल्यावर, तिला काव्यसंग्रहांचे रूप प्राप्त झाल्यावर; त्यानंतर मग समावेशक अशा समीक्षा-विश्लेषणाला सुरुवात होत असते. ६० नंतरच्या बहुआयामी मराठी काव्यप्रवाहाची समीक्षा साधारणपणे १९९० नंतर आकाराला आलेली दिसते. त्यानंतरच्या गत तीन दशकांत त्याविषयीचे निश्चित असे मूल्यात्मक निष्कर्षही प्रतिपादित केले गेले. प्रस्तुत संग्रहास जोडलेल्या काव्यसमीक्षाग्रंथाच्या सूचीवरूनही ह्या विशिष्ट वाङ्मयव्यवहाराची कल्पना येऊ शकते. आधुनिक मराठी काव्यपरंपरेला खऱ्या अर्थाने 'नवी' वळणे आणि नवे' प्रवाह साठोत्तर काळातच मिळालेले दिसतात. आठशे वर्षांच्या समृद्ध मराठी काव्यपरंपरेला ह्याच काळात नवनवे वैशिष्ट्यपूर्ण धुमारेही फुटलेले दिसतात. प्रस्तुत संपादनात मराठी काव्यधारेची हीच विविधता आणि समृद्धता संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे.
Maharashtracha Bhugol 2 SYBA Fourth Semester - SPPU
Par Abc. 2021
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) SYBA Geography (S1) Semester - IV साठी महाविद्यालयीन 'महाराष्ट्राचा भूगोल 2' हे पाठ्यपुस्तक प्रकाशित कलेले…
आहे. या नवीन अभ्यासक्रमात एकूण चार प्रकरणे आहेत: १. कृषी, २. लोकसंख्या आणि वसाहत, ३. ग्रामीण विकास आणि ४. पर्यटन. 'महाराष्ट्राचा भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल यात शंका नाही. ज्या राज्यात आपण राहतो त्याची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश हा विषय सुरू करण्याचा आहे.
Grahvyavasthapan class 11 - Maharashtra Board: गृहव्यवस्थापन इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021
गृहव्यवस्थापन इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री.…
विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. गृहव्यवस्थापन या विषयाचे पाठ्यपुस्तक व्यवस्थापनाची तत्त्वे आणि प्रक्रिया व त्याचे घराकरिता उपयोजन यांच्याशी संबंधित आहे. सदर पाठ्यपुस्तक गृहव्यवस्थापनाचा अर्थ व महत्त्व, व्यवस्थापनाचे प्रेरक घटक, व्यवस्थापन प्रक्रिया, निर्णय घेणे, कौटुंबिक संसाधने, गृह स्वच्छता या गोष्टींचे मूलभूत ज्ञान प्रदान करते. या पाठ्यपुस्तकात कुटुंबाचे निवासस्थान आणि घरातील फर्निचर अशा नवीन जिज्ञासा निर्माण करणाऱ्या प्रकरणांची माहिती देते. तसेच पुष्परचना, लँडस्केपिंग यासारख्या प्रकरणांमधून कौशल्य विकासावर भर देता येईल. यामुळे विद्यार्थी अनुभव संपन्न होतात. त्यांच्यात ‘शिका आणि कमवा' ही भावना विकसित होण्यास मदत होते. या पुस्तकातील घटकांमुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात आदान प्रदान वाढून त्यांच्यात सहसंबंध निर्माण होतात.
Granthalay Ani Mahitishastra Class 12 - Maharashtra Board: ग्रंथालय आणि माहितीशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021
ग्रंथालय आणि माहितीशास्त्र इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे…
तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. 'ग्रंथालय आणि माहितीशास्त्र' या विषयाच्या अभ्यासक्रमात नवीन संकल्पनांचा समावेश करणे अथवा त्याचे प्रतिबिंब असणे निश्चितच गरजेचे झाले आहे. या दृष्टिकोनातून सामाजिक हित जोपासणारी सार्वजनिक ग्रंथालय निर्मिती चळवळीची गरज येथपासून ग्रंथालय व्यवस्थापनशास्त्र, माहितीसेवा, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी विविध घटक पाच प्रकरणातून विद्यार्थ्यांना स्पष्ट केले आहेत. वाचकांना हवी असलेली माहितीसाधने व ‘माहिती' घटक कसे पोहचवता येतात हे विविध प्रकरणांद्वारे स्पष्ट केले आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाद्वारे ग्रंथालयातील विविध कार्ये कशी पार पाडता येतील व वाचकांना कार्यक्षमपणे ‘माहितीसेवा' कशा देता येतील, यांसंदर्भातील अभ्यास या पाठ्यपुस्तकात वर्णन केलेला आहे.
Grahvyavasthapan class 12 - Maharashtra Board: गृहव्यवस्थापन इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021
गृहव्यवस्थापन इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री.…
विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. औद्योगिकीकरण, जागतिकीकरण आणि डिजिटायझेशनच्या काळात सहज, स्वास्थ्यपूर्ण आणि दर्जेदार जीवन जगण्यासाठी संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हे पाठ्यपुस्तक गृहव्यवस्थापनाच्या क्षेत्रामधील मूलभूत संज्ञा तसेच आधुनिक बाबी देखील समाविष्ट करते. कौशल्य विकसन, पर्यावरण रक्षण आणि ग्राहकता यांवर देखील पाठ्यपुस्तक केंद्रित आहे. काही घटक उद्योजकता विकासासाठी लाभदायक ठरतील आणि 'कमवा आणि शिका' यासाठी संधी उपलब्ध करून देतील.
Sanrakshanshastra class 11 - Maharashtra Board: संरक्षणशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021
इयत्ता अकरावीचे पुस्तक हे राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेला केंद्रभूत मानून तयार केले गेले आहे. संरक्षणशास्त्र या विषयाच्या वेगवेगळ्या घटकांचा परिचय…
यात दिला आहे. यामध्ये राष्ट्रहित आणि राष्ट्रीय सुरक्षा; भूराजनीती; संरक्षण अर्थशास्त्र; लष्करी इतिहास; विज्ञान आणि तंत्रज्ञानांचे कार्य यांचा समावेश केला गेला आहे. या सर्व संकल्पना भारताच्या संदर्भात चर्चिल्या गेले आहेत. संरक्षणक्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबी या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्याचा तुम्हांला निश्चितच उपयोग होईल. पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करताना सुचवलेले उपक्रम शिक्षक आणि पालकांच्या मदतीने पूर्ण करा. याच बरोबर क्यू. आर. कोडचाही वापर करावा.
Vastrashastra Class 12 - Maharashtra Board: वस्त्रशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
Par Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021
वस्त्रशास्त्र इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री.…
विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ह्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम सुधारित असून त्यात वैशिष्टयपूर्ण अशा मानवनिर्मित तंतू आणि त्याचे आपल्या दैनंदिन जीवनात सतत वाढत जाणारे उपयोग, रंगाई, छपाई व फॅशन डिझायनिंग यांच्याशी संबंधित प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. हे पाठ्यपुस्तक अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांना वस्त्रशास्त्राचे विविध पैलू, त्याचा वैभवशाली प्राचीन इतिहास आणि हल्ली प्रचलित असलेला कल याचे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे. तुम्हांला वस्त्रशास्त्राची निगडीत विविध क्षेत्रांची रूपरेषा दाखविल्यावर भर देण्यात आला आहे.शैक्षणिक वर्ष 2020-2021 च्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तृतीय वर्ष कला शाखेसाठी राज्यशास्त्र सामान्य स्तर पेपर-3 (G-3) CC-1E (3) साठी 'आधुनिक राजकीय…
विश्लेषण' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'आधुनिक राजकीय विश्लेषण' या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश आधुनिक राजकीय विश्लेषण ही एक अध्ययन शाखा म्हणून विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, आधुनिक राजकीय विश्लेषणातील विविध विश्लेषणात्मक सिद्धान्तांचा आणि दृष्टिकोनांचा परिचय होणे आणि आधुनिक राजकीय विश्लेषणाचे दृष्टिकोन अभ्यासणे हे आहे. 'आधुनिक राजकीय विश्लेषण' या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी या अभ्यासक्रमाचा निश्चितच उपयोग होईल या उदात्त हेतूने 'राज्यशास्त्र अभ्यास मंडळ' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी या अभ्यासक्रमाची रचना केली आहे.