 
      Sahityarang Bhag 3 TYBA - RTMNU: साहित्यरंग भाग ३ बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
Audio avec voix de synthèse
Résumé
साहित्यसरितेला तिच्या वाटचालीत वेगवेगळ्या वळणांवर विविध प्रवाह येऊन मिळालेत, त्यामुळे आज तिचे स्वरूप व्यापक झाले आहे. या तिच्या विविध कालखंडातील रूपाची, त्यातील विविध वाङ्मयप्रकारांची आणि विविध प्रवाहांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या दृष्टीने मध्ययुगीन कालखंडातील संत-पंत-तंत साहित्यातील काही घटकांबरोबरच आधुनिक मराठी… साहित्यातील ललितबंध, एकांकिका, कथा, वैचारिक लेख, कविता, व्यक्तिचित्रे इत्यादींना या अभ्यासक्रमात स्थान देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित व्हावी, सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय पातळीवरील परिस्थितीची चर्चा, चिकित्सा आणि चिंतन करण्याची क्षमता वाढीला लागावी, विद्यार्थी साहित्याचा आस्वादक व्हावा व त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाचे आणि जीवनमूल्यांचे त्याला जीवनव्यवहारात उपयोजन करता यावे, साहित्यातील मूल्यगर्भ विचारांचा परिचय होऊन त्याच्या विचारशक्तीला चालना मिळावी, या उद्देशाने या अभ्यासक्रमात दर्जेदार घटकांची निवड मंडळाने केली आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ठरविण्यात आलेले, विद्यार्थिकेंद्रित शिक्षणाचे तसेच अभ्यासक्रमाचे पायाभूत उद्दिष्ट साधले जावे, या मुख्य हेतूने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.