Shikshanshastra Class 12 - Maharashtra Board: शिक्षणशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
Synthetic audio
Summary
इयत्ता बारावी या शिक्षणशास्त्र विषयामध्ये शैक्षणिक तत्त्वज्ञान, शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक समाजशास्त्र, शैक्षणिक व्यवस्थापन, शैक्षणिक संशोधन अशा अनेक विषयांचा समावेश होतो. संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेण्यास शिक्षणशास्त्र विषयाची मदत होते. प्रस्तुत पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आता शिक्षणशास्त्र या विषयाशी अधिक प्रमाणात परिचय… होणार आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून आणखी काही बाबींचे सखोल अध्ययन करावयास मिळेल. अध्ययन प्रक्रियेची मूलभूत संकल्पना आणि तिची वैशिष्ट्ये, उत्तम शैक्षणिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, अभ्यासक्रम विकसनाची तत्त्वे, मूल्यमापन पद्धतीची वैशिष्ट्ये, शैक्षणिक संशोधनाच्या विविध पद्धती आणि शिक्षणक्षेत्रात नव्याने प्रविष्ट झालेले नवप्रवाह हे सर्व जाणून घेणे शिक्षणशास्त्राचा विद्यार्थी म्हणून खूप उपयुक्त व महत्त्वाचे ठरणार आहे.