Sukshma Arthashastra 2 Paper 1 SYBA Fourth Semester - SPPU
Audio avec voix de synthèse
Résumé
द्वितीय वर्ष कला शाखेसाठीच्या सूक्ष्म अर्थशास्त्र (एस-1) भाग II साठी हे पुस्तक पूर्णपणे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काही जास्तीचे मुद्देदेखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी… आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परिभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील कटाक्षाने विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.