Antararashtriya Arthashastra 1 TYBA Fifth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र 1 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे
Audio avec voix de synthèse
Résumé
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून कला व वाणिज्य विद्या शाखांसाठी CBCS पद्धती लागू केली आहे. त्यानुसार पदवी व पदव्युत्तर वर्गाचे अभ्यासक्रम बदलण्यात आले. तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र: Special - III अंतर्गत 'आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र' हा विषय निर्धारित करण्यात… आला आहे. 'आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र १' हा विषय या पूर्वीच्या अभ्यासक्रमात होताच; परंतु नवीन अभ्यासक्रमामध्ये काही जास्तीचे घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या पुस्तकात सर्व नवीन सिद्धान्त आणि घटकांचे विश्लेषण सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी पडेल.