Granthalay Ani Mahitishastra Class 12 - Maharashtra Board: ग्रंथालय आणि माहितीशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
Synthetic audio
Summary
ग्रंथालय आणि माहितीशास्त्र इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. 'ग्रंथालय आणि माहितीशास्त्र' या विषयाच्या अभ्यासक्रमात नवीन… संकल्पनांचा समावेश करणे अथवा त्याचे प्रतिबिंब असणे निश्चितच गरजेचे झाले आहे. या दृष्टिकोनातून सामाजिक हित जोपासणारी सार्वजनिक ग्रंथालय निर्मिती चळवळीची गरज येथपासून ग्रंथालय व्यवस्थापनशास्त्र, माहितीसेवा, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी विविध घटक पाच प्रकरणातून विद्यार्थ्यांना स्पष्ट केले आहेत. वाचकांना हवी असलेली माहितीसाधने व ‘माहिती' घटक कसे पोहचवता येतात हे विविध प्रकरणांद्वारे स्पष्ट केले आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाद्वारे ग्रंथालयातील विविध कार्ये कशी पार पाडता येतील व वाचकांना कार्यक्षमपणे ‘माहितीसेवा' कशा देता येतील, यांसंदर्भातील अभ्यास या पाठ्यपुस्तकात वर्णन केलेला आहे.