Grahvyavasthapan class 11 - Maharashtra Board: गृहव्यवस्थापन इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
Synthetic audio
Summary
गृहव्यवस्थापन इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. गृहव्यवस्थापन या विषयाचे पाठ्यपुस्तक व्यवस्थापनाची तत्त्वे आणि प्रक्रिया व… त्याचे घराकरिता उपयोजन यांच्याशी संबंधित आहे. सदर पाठ्यपुस्तक गृहव्यवस्थापनाचा अर्थ व महत्त्व, व्यवस्थापनाचे प्रेरक घटक, व्यवस्थापन प्रक्रिया, निर्णय घेणे, कौटुंबिक संसाधने, गृह स्वच्छता या गोष्टींचे मूलभूत ज्ञान प्रदान करते. या पाठ्यपुस्तकात कुटुंबाचे निवासस्थान आणि घरातील फर्निचर अशा नवीन जिज्ञासा निर्माण करणाऱ्या प्रकरणांची माहिती देते. तसेच पुष्परचना, लँडस्केपिंग यासारख्या प्रकरणांमधून कौशल्य विकासावर भर देता येईल. यामुळे विद्यार्थी अनुभव संपन्न होतात. त्यांच्यात ‘शिका आणि कमवा' ही भावना विकसित होण्यास मदत होते. या पुस्तकातील घटकांमुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात आदान प्रदान वाढून त्यांच्यात सहसंबंध निर्माण होतात.