Gomant Bharati Pustak Tisare Tritiy Bhasha-Marathi class 10 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक तिसरे तृतीय भाषा-मराठी इयत्ता दहावी - गोवा बोर्ड
Audio avec voix de synthèse
Résumé
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे तयार करण्यात आलेले 'गोमंत भारती, पुस्तक तिसरे' हे पाठ्यपुस्तक इयत्ता दहावीच्या तृतीय भाषा मराठी या विषयासाठी आहे. मंडळाने संमत केलेल्या मराठीच्या अभ्यासक्रमानुसार या पाठ्यपुस्तक मालेचे आयोजन केलेले असून तिच्यातील पहिली दोन पुस्तके पूर्वीच… प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना अनुसरूनच प्रस्तुत पाठ्यपुस्तकातील वेच्यांची निवड केली आहे, व भाषाभ्यास दिला आहे. पाठपरिचयं, लेखकपरिचय, शब्दार्थ, टीपा इ. गोष्टीही पूर्वीच्या पद्धतीने दिल्या आहेत. संपादकीय धोरणातील या सुसूत्रतेमुळे या विषयाच्या अभ्यासामागील उद्दिष्टे सुलभतेने सफल होतील, असा विश्वास वाटतो. भाषेचा अभ्यास, साहित्याची गोडी व मानवी मूल्यांचे आकलन हीच ती उद्दिष्टं होत. प्रस्तुत पाठ्यपुस्तकातील गद्य - लेखन मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र शासन व शैक्षणिक संस्था यांनी पुरस्कृत केलेल्या शुद्धलेखनविषयक नियमांना अनुसरून केले आहे.