
Sugam Marathi Vyakaran va Lekhan Shabdratna FYBA New NEP Syllabus - RTMNU: सुगम मराठी व्याकरण व लेखन शब्दरत्न एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
Résumé
सुगम मराठी व्याकरण व लेखन - शब्दरत्न हे मो. रा. वाळंबे लिखित पुस्तक मराठी भाषेचे व्याकरण आणि शब्दसंपदेचा समग्र अभ्यास करणारे एक उपयुक्त साधन आहे. विद्यार्थ्यांपासून ते शिक्षक, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि भाषा अभ्यासकांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते. या ग्रंथात… समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, पारिभाषिक शब्द व तत्सम-तद्भव शब्द यांचे सविस्तर संकलन अकारविल्हेक्रमानुसार मांडलेले आहे. वाक्यरचनेतील सौंदर्य, भाषेतील गोडवा आणि भाषिक अभिव्यक्तीचा कस अशा विविध अंगांनी शब्दवैभव सादर केले आहे. विद्यार्थी परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी तसेच मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी या शब्दरत्नाचा उपयोग करू शकतात. यामध्ये ९०० पेक्षा अधिक म्हणी-वाक्प्रचार, वेगवेगळ्या बोलीभाषांतील म्हणी आणि इंग्रजी-मराठी म्हणींची तुलना करून भाषिक समृद्धी साधली आहे. शब्दांच्या सूक्ष्म भेदांपासून ते व्याकरणाच्या नियमांपर्यंतचा सखोल अभ्यास या पुस्तकात करता येतो. ‘शब्द हीच आपली खरी संपत्ती’ हा भाव मांडणारे हे पुस्तक मराठी भाषा शिकणाऱ्यांना शब्दांचे दालन खुले करून देणारे आहे.