
Speedpost: स्पीडपोस्ट
Synthetic audio, Automated braille
Summary
आई आणि मुलांमधला रक्तबंध आदिम... शरीराने आणि मनानेही काळजाशी घ्ट्ट बांधलेला! सुंदर, निरामय जीवनमूल्यांना पैशाच्या दावणीशी बांधून मानवी नात्यांमधला प्राणच शोषू पाहाणार्या आधुनिक अर्थसत्तेने आई मुलांच्या नात्याला नवं परिमाण दिलं आहे. हादरे आणि आव्हानही दिलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम लेखिका… शोभा डे यांनी आधुनिकतेच्या झंझावातात जगणार्या आपल्या सहा मुलांना लिहिलेली ही पत्रं... जगातल्या कुठल्याही आईला तिचीच वाटतील अशी! गोंधळून टाकणार्या, जीवघेण्या स्पर्धेत लोटून उद्ध्वस्त करणार्या दुनियेशी टक्कर देणं अपरिहार्यच बनलेल्या आपल्या मुलांसाठी कुणाही आईचं काळीज तुटावं, अशा प्रत्येक विषयाची चर्चा या पत्रांमध्ये आहे.